Ad will apear here
Next
पाच वर्षांच्या अवनीची चित्रकला करतेय थक्क!
पुण्यात सुरू आहे प्रदर्शन; ११ ऑगस्टपर्यंत पाहता येणार

पुणे : निळ्याशार समुद्रातील रंगीबेरंगी मासे... अवतीभोवती  सुंदर झाडे असलेले ट्री हाऊस... रंगीबेरंगी पक्षी... फुलपाखराच्या आकारातील कोलाज... हातांच्या ठशांनी साकारलेले सुंदर चित्र... अशा विविध प्रकारच्या चित्रांच्या माध्यमातून अवघ्या पाच वर्षांच्या अवनीने आपले अनुभवविश्व कॅनव्हासवर साकारले आहे. या चिमुरडीची ही सुंदर चित्रे, तिची चित्रकलेतील समज बघून प्रेक्षक थक्क होत आहेत.


बालचित्रकार अवनी पंडित हिच्या चित्रांचे ‘सॅपलिंग स्पिरिट’ हे चित्र प्रदर्शन पुण्यातील औंध येथील पी. एन. गाडगीळ अँड सन्सच्या कलादालनात सुरू आहे. हे चित्रप्रदर्शन रविवार, ११ आॅगस्टपर्यंत सकाळी ११ ते रात्री आठपर्यंत विनामूल्य खुले राहणार आहे. 

या चित्रप्रदर्शनाचे उद्घाटन ज्येष्ठ कलाकार मिलिंद फडके, दिलीप कदम, डॉ. अरविंद पंडित यांच्या हस्ते झाले. या वेळी अवनीचे आई-वडील प्रिया पंडित, अजित पंडित, प्राची सिद्दीकी, अभिजीत नेवे, पल्लवी नेवे, उषा पाटकर, अमिता पंडित, नेहा मंगळवेढेकर, सुचित्रा भावे आदी उपस्थित होते. 


अवनीने पेन्सिल, ऑईल पेस्टल्स, वॉटर कलर, अॅक्रेलिक कलर या माध्यमांचा वापर करून ३५ हून अधिक चित्रे साकारली आहेत. त्याशिवाय डब्याचे झाकण, स्पंज, भाज्या, पाने अशा विविध गोष्टींचे ठसे, धावदोरा, रंगीत कागद यांचा वापर करून काही चित्रे साकारली आहेत. ही सगळी चित्रे नजर खिळवून ठेवत आहेत.  

‘अवनी वयाच्या दुसऱ्या वर्षापासून चित्र काढायला लागली. मी फाईन आर्टस् केलेले असल्याने माझे काम सुरू असताना ती बघायची. मलाही कागद, पेन्सिल, रंग दे असे सांगायची. मी करते, असे तिचे प्रत्येक गोष्टीत असायचे. प्रत्येक गोष्ट करून बघण्याचा तिचा उत्साह दांडगा असायचा. मीही तिला नेहमी प्रोत्साहन द्यायचे. त्यातूनच तिचा हा छंद वाढत गेला आणि आज वयाच्या पाचव्या वर्षी तिचे स्वत:च्या चित्रांचे प्रदर्शन भरले आहे, ही खूप आनंदाची बाब आहे,’ अशा शब्दात  अवनीच्या आई प्रिया पंडित यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. 



 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/XZWMCD
Similar Posts
पेशवाईचा काळ अनुभवा चित्रांमधून... पुणे : पुणेकरांच्या अभिमानाचा आणि पुण्याच्या इतिहासाचा अविभाज्य भाग म्हणजे ‘पेशवाई’. वैशाली राजापूरकर यांनी ‘पेशवाई’ या संकल्पनेवर आधारित काढलेल्या चित्रांचे प्रदर्शन ११ एप्रिलपासून सुरू झाले आहे. कलाप्रेमींना हे प्रदर्शन औंध येथील वेस्टएंड सेंटरमधील ‘पु. ना. गाडगीळ अँड सन्स’च्या कलादालनात पाहता येईल
सूक्ष्मातील भव्यता दर्शविणाऱ्या चित्रांचे प्रदर्शन पुणे : आंतरराष्ट्रीय ख्यातीचे नामवंत चित्रकार झेन वर्तन यांच्या सूक्ष्मातून भव्यतेचा शोध घेणाऱ्या चित्रांचे प्रदर्शन कोरेगाव पार्क येथील मोनालिसा कलाग्राममध्ये आयोजित करण्यात आले आहे. या प्रदर्शनात त्यांनी ‘सूक्ष्मातून भव्यतेचा-भव्यतेतून सूक्ष्माचा शोध’ या संकल्पनेवर आधारीत चित्रांमध्ये अंतर्मुख ध्यानाचा प्रवाह चित्रित केला आहे
मसाल्यांच्या पदार्थांपासून साकारलेल्या चित्रांचे प्रदर्शन पुणे : लवंग, मिरी, दालचिनी हे मसाल्याचे पदार्थ खाद्यपदार्थांचा स्वाद वाढवण्यासाठी वापरले जातात; पण अरविंद जोशी यांनी मसाल्याच्या पदार्थांचा वापर करून चित्रे साकारली आहेत. या अनोख्या चित्रांचे ‘इंटरफ्यूजन’ हे प्रदर्शन सध्या दर्पण आर्ट गॅलरीमध्ये सुरू आहे.
डॉ. आंबेडकर महाविद्यालयात ‘मुलगी झाली हो!’ नाट्याचा प्रयोग पुणे : रयत शिक्षण संस्थेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात लोकायत सामाजिक संस्था आणि मराठी विभाग यांच्या वतीने ज्योती म्हापसेकर लिखित ‘मुलगी झाली हो!’ या नाट्याचा प्रयोग आयोजित करण्यात आला होता.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language